पाउस आला सर सर सरी
कोसळल्या धरतिवरी
पावसात ह्या चिम्ब न्हाउनी
मन माझे आनंदाती
घरात आणिक पावसाने
अंधार दाटून येई
वीजही आज पाठशिवणीचा
खेळ खेलुनी घेई
रात्र वाढती थंडी सोबत
तिच्या असे नेहेमी
आज मात्र चादर काली
चंद्र ओढुनी घेई
पाउस अत थोड़ा
कमी बरसात होता
वातावारणातिल कुंदपणा
अजुनी टिकून होता
कही दिवसातच पाउसही
ओसरू पाहि
जाताना मात्र सर्वाना
हिरवा आनंद देऊनि जाई
No comments:
Post a Comment