Monday, June 23, 2008

एक दिवस

आयुष्यातील एक दिवस ...
जगु दया मला माझ्यासाठी ...

तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या यशाचा आनंद लुटन्यासाठी
तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या अपयशाला चुचकारण्यासाठी

मी असेन फक्त एकटी
फक्त एकाच दिवसासाठी
दुसरे कोणीही नसेल सोबत
'तो' दिवस उपभोगान्यासाठी

इच्छा नाही मला त्या दिवशी
काहीही करण्याची इतरांसाठी
इच्छा नाही मला share करण्याची
ते क्षण कोणाही सोबत
जे मी lock केले असतील माझ्यासाठी

पण
आता नाही वाट पहायची मला
त्या दिवसाची
आता प्रत्येक क्षण जगायचा आहे मला
फ़क्त अणि फ़क्त माझ्यासाठी

No comments: