Monday, July 21, 2008

इडली ,ऑर्किड आणि मी ---विठ्ठल कामत

मध्यंतरी माज्या वाचनात एक पुस्तक आले विठ्ठल कामत यांचे इडली,ऑर्किड आणि मी .....
एक अतिशय अप्रतिम पुस्तक प्रत्येक नवनवे प्रयोग करू पाहणार्याने नक्की वाचावे असे आहे हे पुस्तक लेखकाने अत्यन्त प्रांजळपणे लिहिले आहे हे पुस्तक लेखकाची दूरदृष्टि विचार करण्याची क्षमता अगाध असल्याचे सांगते
इतके पारदर्शक आत्मचरित्र मी आजपयॅंत कधी नाहीये वाचले हे असे पुस्तक आहे की ज्याच्या मराठीत तब्बल २२ आवृत्या निघाल्या आहेत
लेखकाने अतिशय प्रामाणिकपणे लिहिले आहे इतके की लेखकाने पुस्तकात त्याने लहान म्हणजे शाळेत असताना चड्डी घान केल्याचेही प्रामानिक्पने लिहिले आहे आणि त्याच सोबत त्याने जेव्हा लेखकाला तब्बल २८२ कोटींचे कर्ज होते अणि हातात काहीही नव्हते तेव्हा त्याने अत्म्हात्येचाही विचार केला होता हेही तितक्याच प्रामाणिकपणे लिहिले आहे
आज लेखकाच्या ऑर्किड ह्या एकोटेल ला आशियामधिल पाहिले एकोटेल असण्याचा मान मिलला आहे अणि तरीही लेखकाला कोणत्याही प्रकारचा गर्व नाहीये आज ही लेखक आपल्या आई अणि वादिलाना प्रचंड मानतो
आज लेखकाने एक जुन्या गाधी मध्ये एक असे होटल सुरु केले आहे की जगातील पाहिले म्यूज़ियम होटल आहे आणि हे म्यूज़ियम लेखकाने इतर कुणाला नही तर जगातील सर्व आई वर्गास समर्पित केला आहे
लेखक पुस्तकाच्या नावातूनच त्याचा आइबअद्दल्च्या सार्या भावना व्यक्त करतो लेखक सांगतो त्याने इडली बनावान्यास आपल्या आई कडून शिकला म्हणजे त्यानी आपल्या आइस त्या बनवताना पहिल्या आणि जेव्हा लेखक परदेशी नशीब आजमावान्यास गेला तेव्हा त्याने तिथे एका भारतीय Restaurant मध्ये त्या बनवल्या आणि त्यामधे लेखक यशस्वी जाला आणि त्यानातर जवळ जवळ प्रत्येक वेळी लेखकाला यश मिळत गेले
परदेशी जाताना लेखकाने आपल्या वडिलांकडे फ़क्त एकेरी म्हणजे जतानाचेच टिकेट मागितले होते आणि असेही सांगितले होते की जर त्या लोकाना वाटले तर ते मला परत पाठवतिल इतका आत्मविश्वास असनारा माणूस विरालाच आणि मराठी ????????? तर नाहीच
आई प्रमाणेच लेखक आपल्या वडिलाना पण खूप मानतो लेखक म्हणतो की माज्हे वडिल सांगायचे "तू कामत आहेस तर काम कर " आणि लेखक असेही म्हणतो की मी जर आज इतका मोठा जालो आहे तर तो फ़क्त माज्या आई अणि वडीलांमुळे त्यानी माझ्यावर केलेल्या संस्कारान्मुले
लेखक आता असे म्हणतो की ,"आता मज्हे ह्या येत्या ८ वर्षातील ध्येय म्हणजे आता Nobel Prize मिळवायचे आहे कारण Nobal तर मी आहेच फ़क्त 'A' चा 'E' करायचा बाकी आहे "
हे पुस्तक वाचानारा माला नाही वाटत की आयुष्यात कधी अयशस्वी होऊ शकेल किम्बहुना मी म्हानें की तो अपयशाला केव्हाही तयार राहिल



10 comments:

Unknown said...

हाय ज्ञानदा,छान ब्लॉग आहे.. अशीच अजुन पुस्तकांची ओळख करून दे..
फक्त एक कर.. शुद्धलेखनाकडे लक्ष दे ना जरा? फार अडखळल्यासारखं होतं वाचताना..

साधक said...

लेखन सुधारा.

Dnyanda said...

nakkich sudharen thanks for suggesions

Anonymous said...

pustak tumhi vachlat Tyamule tumhi bharbharun bolta ahat pustakavishayi . pustakat kay ahe yapeksha tyane kas mandalay yavishyi tumhi jast sangtay ase mala vatate teva kay lihle ahe he sangatach lekhakachi lihinyamagchi drushti pan sangayala pahije ase vatate

Dnyanda said...

ektar tumhi kay mhanatay he mala nahi kalat ahe jara vistarane bolalat tar jasti bare hoil ani please anonymously naka comments lihu ughadpane tumache naav liha maza kahich akshep asanar nahi

Sanjeev Oak said...

लेखनशैली चांगली आहे. तथापि, पुस्तकातून लेखकाने जो मेसेज दिला आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त संयुक्तिक होईल. इडली मध्येच कामत यांनी खूप काही मेसेजेस दिले आहेत. ते सर्वांपर्यंत पोहोचू देत. हार्दिक शुभेच्छा...

माझी माय मराठी said...

नमस्कार, श्री विठल कामत यांचे पुस्तक मी सुद्धा वाचले आहे ते सुद्धा तब्बल ६-७ वेळा
मी इथे वाचकांना नक्कीच सांगेन ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेल त्यांना मी नक्कीच आग्रह करेन वाचायला.
उदयोजक होणारच मी ! (दुसरे पुस्तक ) http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4

- सुशांत - मराठी मन

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

शुद्धलेखनात चुका असल्या तरीही ब्लोग लिहताना मात्र पुस्तकाच्या गाभाऱ्याला हात घातला आहे।
पुढील लेखनासाठी शुभेच्छा…!!!